दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्ह्यातील सर्व रस्ते जाम करणार.. भाजप नेते गिरीष महाजण
प्रतिनिधि ... (नितीन इंगळे ) सध्या होत असलेले लोडशेडींग बंद व्हावे व नियमीतपणे वीज पुरवठा व्हावा या मागणीसाठी आज गिरीष महाजण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जळगाव भाजपातर्फे भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला असून माझा शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी रात्रीचा दिवस करतोय, सर्वसामान्य जनता लोडशेडिंगमुळे घामात भिजतेय, व्यापारी-उद्योजक सर्वच विजेच्या समस्यांमुळे त्रस्त असताना आम्ही स्वस्थ बसू शकत नाही अशी भूमिका घेत जोपर्यंत लोडशेडिंग बंद व शेतीला नियमित वीजपुरवठा संदर्भात ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनस्थळावरून उठणार नाहीत - आमदार गिरिषभाऊ महाजन यांनी सांगितल
राज्यात भाजपा सरकार असतांना एक तास सुध्दा लोडशेडींग झाले नाही. आता मात्र राज्यावर विजेचे संकट कोसळले आहे. आता शेतकर्यांसमोर महाविकासआघाडी सरकारने आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय ठेवलेला नाही.
दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्ह्यातील सर्व रस्ते जाम करणार असल्याचा इशारा यावेळी राज्य सरकारला दिला
विजेच्या समस्येकडे लक्ष वेधून याचे निराकरण करण्यासाठी भाजपने मोर्चा काढला आहे. जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे भाजप नेते गिरीष महाजन यांनी सांगितले
Comments
Post a Comment