Posts

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

Image
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे  उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील नरसिमानंद यांच्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात जामनेर येथे मुस्लिम समाजाने पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. नरसिमानंद यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपमानास्पद आणि द्वेषपूर्ण वक्तव्ये केली असून, त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे निवेदन पोलीस निरीक्षक कासार साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक काळे साहेब यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नरसिमानंद यांनी जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे हिंदू-मुस्लिम समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या धार्मिक सभांमध्ये फक्त इस्लाम धर्माचे विचार मांडले जातात, कोणत्याही इतर धर्म किंवा जातीविरोधात अपमानास्पद वक्तव्ये केली जात नाहीत. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी नरसिमानंद यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आह...

जामनेरात ५१ फुटी रावणाचे दहन... महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावण दहन..

Image
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे गेल्या ५० वर्षापासून जामनेर शहरांमध्ये रावण दहनाची परंपरा असून दसरानिमित्त जामनेर शहरातील दसरा मैदानावर ५१ फुटी रावणाचे दहन राज्याचे   ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते झाले आहे.या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर रंगीबेरगी बिरंगी फटाक्याची आतिशबाजी झाली. रावण दहन श्रीराम मित्र मंडळ श्रीराम पेठ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. गेल्या महिन्याभरापासून उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर व मनोहर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी महिनाभरापासून रात्रंदिवस श्रीराम पेठ मित्र मंडळ परिश्रम घेतले होते.  रावण दहनाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पाचोरा तालुक्यात गुटखा किंगचा हैदोस.... आमचे हात दिल्लीपर्यंत

Image
  दैनिक शिवस्वराज्य न्युज     शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३ जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे पाचोरा तालुक्यातील लोहारा, पिंपळगाव हरेश्वर व पाचोरा येथील गुटखा किंग सर्व नियम व कायदे खिशात ठेवून दिवसाढवळ्या, राजरोसपणे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हे गुटखा विक्रेत्यांनी कायदा आमच्या बापाचा समजून भरवस्तीत, राहत्या घरी, दुकान, पानटपरी, शेतातील गोदामात किंवा काण्या, कोपऱ्यात अडगळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करुन ठेवला असून मागणीनुसा आसपासच्या खेड्यापाड्यातील किराणा दुकान, पान टपरी, हॉटेल, उपहारगृहात हे गटखा किंग घरपोच सेवा देत असल्याने गावागावात, खेड्यापाड्यातील वाडावस्तींवर मुबलक प्रमाणात गुटखा विक्री केला जात आहे. विशेष म्हणजे हे अवैधरित्या गुटखा विक्री करणारे व्यावसायिक गल्लीत राहुन आमचे हात दिल्लीपर्यंत असल्याचे खुलेआमपणे बोलून आम्ही संबंधितांना हप्ते देतो असे सांगून गावपातळीवर दहशत निर्माण करत आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला पण त्याला आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र गुट...

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

Image
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे जामनेर तालुक्यातील फत्तेपूर मादनी रस्त्यावर ईको कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे भाऊ ठार झाले असून कारचालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, फत्तेपूरहून जळगाव येथे इको कार (एमएच १९ ईए २७७९) हि जळगावला वृद्ध रुग्णाला घेऊन निघाली होती. कारमध्ये वृद्ध महिला, पुरुष, त्यांचा नातू व सून असे होते. कार लोणी गावाजवळ आली असताना समोरासमोर दोघांची जबर धडक झाली, अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील सौरव कैलास कोळी (वय २२, रा. कोदोली ) हा तरुण मयत झाला. तर दुचाकीवरील दुसरा शुभम दिनकर जाधव (वय २८, रा. शिगाईत ता. जामनेर ) हा गंभीर जखमी असून त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता तेथे प्रथमोपचार झाल्यावर खाजगी रुग्णालयात नातेवाईकांनी नेत होते. तेथे त्याचा मृत्यू झाला आहे. तर इको कारवरील चालक मंगेश संतोष कोळी ( वय २०, रा. फत्तेपूर) हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु...

मनुदेवी ते तळेगाव पायी ज्योत जैनाबाद ग्रुप चा रिकॉर्ड

Image
तळेगाव प्रतिनिधी शिवाजी जाधव तळेगाव येथील जैनाबाद ग्रुप मित्र मडळ सलग आता 8 वे वर्ष पायी ज्योत   आणतात सालाबादा प्रमाणे या वर्षी सुद्धा  त्यानी पायी ज्योत आणली. मनदेवी  ते  तळेगाव 90 किलो मीटर अंतर यानी 8 तास 13मिनिट  मधे पार  केले मनु  देवी  वरुण  पायी  येण्या साठी  12.27 तास  लागतात.  या ग्रुप  ने  मात्र  पायी  चालत  येण्याचा  रेकॉर्ड   तोडला हे  विशेष.  यात ग्रुप  अध्यक्ष अरुण कोळी उपाध्यक्ष राजू कोळी, पत्रकार तथा मा, अध्यक्ष शिवाजी जाधव लोकमत पत्रकार  गजानन कोली सर, सदस्य, दीपक कांबळे शुभम माळी ,अमोल कोळी,  पवन कोळी, कृष्णा माळी, धनराज कोळी  अरुण वाघ, ज्ञानेश्वर शिंदे, भूषण माळी, अजय कोळी गोपाल जाधव ,विशाल कोळी ,ऋषिकेश जिरी, सर्वेश कोळी ,जीवन कोळी, शुभम पाडोळसे रामचंद्र शिंदे, यश वाघ, रोशन घोरपडे ,भारत पाडोळसे ,परमेश्वर कोळी ,खंडू कोळी सागर कोळी ,नवल कोळी ,किशोर पाडळसे धीरज कोळी, सौरव कोळी ,संभा कोळी, अरुण कोळी, विजय कोळी, पवन कोळी, ...

मातीमिश्रीत रेतीने संरक्षण भिंतीचे बांधकाम काम सुरू...

Image
  दैनिक शिवस्वराज्य न्युज     शनिवार, १४ ऑक्टोबर जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे पहुर - जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथील स्मशानभूमी येथील संरक्षण भिंतीचे काम मातीमिश्रीत रेतीने सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अश्या मागणीसह कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावण्याची जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथील स्मशानभूमी येथील चांगले संरक्षण भिंतीचे काम करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांमधून केली जात होती. पहुर कसबे येथील स्मशानभूमी येथील संरक्षण भिंतीचे काम काही दिवसांपासून सुरू करण्यात आले असून चक्क त्या संरक्षण भिंतीच्या कामाला मातीमिश्रीत रेती वापरली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. संरक्षण भिंतीचे काम ईस्टीमेट प्रमाणे होत आहेत का ? कोणत्या योजनेतून हे काम सुरू आहेत ? किती रूपयांचे हे काम सुरू आहेत ? या कामाचा ठेकेदार कोण आहेत ? कोणत्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहेत ? संरक्षण भिंतीच्या कामाला वापरली जाणारी...

जामनेर येथे सोमवारी युवासेना काढणार कापसाची अंत्ययात्रा.....

Image
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे        शासन कापसाला भाव देतं नसल्याने शेतकऱ्यांना कापूस मिळेल त्या भावात विकावा लागत आहे,  तर अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांच्या घरातच असल्याने युवासेना (उद्धव ठाकरे गट)सोमवार दि- २९ मे रोजी सकाळी 10:00 वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा कापसाच्या अंत्ययात्रेचा मोर्चा नेत असल्याची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण यांनी दिली आहे.       यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेस त्यांनी तालुक्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे ते असे, आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की, आपल्या खान्देश चे लाडके पीक, पांढरे सोनं - कापूस गेल्या सात महिन्यापासून भाव वाढ मिळेल याची वाट पाहत त्याने जागे वरचं दम सोडला आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी मायबापाने पोटाच्या गोळ्या प्रमाणे त्याची सेवा केली. त्याला लहान चे मोठे केले. किंबहुना मागील चार महिन्या पासून कापसाला रोगराई ने घेरले होते. संपूर्ण आंग खाजवत होते. अश्या मध्ये त्याला उज्ज्वल भविष्य येईल.माझा कापूस जगाची माय लेकिंची अब्रू झाकणारा म्हणून, अपेक्षे...