जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील नरसिमानंद यांच्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात जामनेर येथे मुस्लिम समाजाने पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. नरसिमानंद यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपमानास्पद आणि द्वेषपूर्ण वक्तव्ये केली असून, त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे निवेदन पोलीस निरीक्षक कासार साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक काळे साहेब यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नरसिमानंद यांनी जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे हिंदू-मुस्लिम समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या धार्मिक सभांमध्ये फक्त इस्लाम धर्माचे विचार मांडले जातात, कोणत्याही इतर धर्म किंवा जातीविरोधात अपमानास्पद वक्तव्ये केली जात नाहीत.
मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी नरसिमानंद यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे, कारण त्यांच्या वक्तव्यांमुळे सामाजिक एकोपा आणि बंधुभाव धोक्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देणाऱ्यांमध्ये एल. एस. खान, अॅडवोकेट रफिक शेख, डॉ. इम्तियाज खान, खलील खान, माजी नगरसेवक शरीफ मंसुरी, अन्वर पैलवान, इरफान शेख, शराफत अली (अब्बू), आरिफ मेंबर, आसिफ शेख, जाकीर खान, खालीद साहब, इमरान खान, साबीर ठेकेदार, शेख सईद, आसिफ वायरमेन, इमरान शेख, फिरोज गुड्डू, सईद भाई यांचा समावेश होता.
मुस्लिम समाजाने जामनेर पोलिसांना आवाहन केले आहे की, नरसिमानंद यांच्या विरोधात कठोर कारवाई करून धार्मिक सलोखा कायम ठेवावा, जेणेकरून शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहील.
Comments
Post a Comment