शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....

      उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री.रविंद्र मिरलेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेना भवन येथे वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री.राहुल भाऊ चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते श्री.ज्ञानेश्वर बोरसे,प्रहार चे विधानसभा क्षेत्र प्रमुख जीवन सपकाळे,नरेंद्र धुमाळ, विशाल माळी,मनोज मिस्तरी, श्री.मिलिंद सपकाळे,अर्जुन राठोड यांच्यासह अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना सह-संपर्क प्रमुख मनोहर पाटील, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, युवासेना जिल्हाप्रमुख चंदू शर्मा, मा. शिवसेना शहर प्रमुख पवन माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील इतर शिवसैनिक  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी