वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना संरक्षणासाठी नागरिकांना मोफत मास्क वाटप | सामाजिक कार्यकर्ते प्रफुल लोढा यांचा पुढाकार

प्रतिनिधि .. नितीन इंगळे                                             जामनेर तालुक्यातील पहूर गावचे रहीवासी प्रफुल लोढा यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जामनेर शहरात व परिसरात सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटकाळात आपणही गावातील नागरिकांसाठी काहीतरी मदत करू शकतो, या उदात्त हेतूने आपल्या वाढदिवसाच्या होणाऱ्या खर्चाला फाटा देत मास्क चे जामनेर शहरात  वाटप केले. 
कोरोनाची ही तीसरी लाट असून गावोगावी कोरोनाने कहर केला आहे. अशातच गावातील नागरिकांना चांगल्या पध्दतीचे फेस मास्क, सॅनिटायझर व इतर सुविधा आपणही देऊन एक चांगले कार्य करू शकतो या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते प्रफुल लोढा व त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीने नियोजन करण्यात आले होते शासनाच्या नियमाचे पालन करून मास्क, वाटप करण्यात आले प्रफुल लोढा  नागरिकांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवीत असतात त्यामुळे त्यांची स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा विषाणूने कहर केला आहे  कोरोनाचे संशयित नसले तरी शासन, प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आपल्या शहरातील नागरिकांचे कोरोना विषाणूंपासून बचावाकरिता प्रफुल लोढा यांनी स्वखर्चातून मास्कचे वाटप केले आहे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....