जामनेरात ५१ फुटी रावणाचे दहन... महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावण दहन..

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
गेल्या ५० वर्षापासून जामनेर शहरांमध्ये रावण दहनाची परंपरा असून दसरानिमित्त जामनेर शहरातील दसरा मैदानावर ५१ फुटी रावणाचे दहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते झाले आहे.या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर रंगीबेरगी बिरंगी फटाक्याची आतिशबाजी झाली. रावण दहन श्रीराम मित्र मंडळ श्रीराम पेठ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. गेल्या महिन्याभरापासून उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर व मनोहर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी महिनाभरापासून रात्रंदिवस श्रीराम पेठ मित्र मंडळ परिश्रम घेतले होते.  रावण दहनाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....