राज्यातील ठाकरे सरकार हे गांधीजींच्या तीन माकडांसारखे ... माजी मंत्री गिरीष महाजन

    प्रतिनिधि ... नितीन इंगळे                                        राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जुलमी राजवटित महावितरणचा अतिशय भोंगळ करोभार सुरू आहे शेतात उभ्या असलेल्या पिकांकडे दुर्लक्ष करीत बिनबोभाटपणे विजतोडणी सुरू आहे. सहा-सात महिने मागणी करूनसुद्धा ट्रान्सफॉर्मर मिळत नाही.
अवकाळी पाऊस, मोठ्या मोठ्या बाता मारूनसुद्धा त्याची आजवर न भेटलेली नुकसानभरपाई, पिकांना न मिळणारा हमीभाव, धान्य खरेदीचे ढिसाळ नियोजन आणि त्यात आता शेतात पाणी असूनसुद्धा वीजवितरण महामंडळाच्या भोंगळ नियोजनामुळे जगावे की मरावे या परिस्थितीत शेतकरी आहे राज्यातील ठाकरे सरकार हे गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे असून जनतेच्या - शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.
राज्यसरकारच्या तुघलकी वृत्तीमुळे शेतकरी पेटून उठला आहे ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात आज जामनेर येथील तहसील कार्यालयावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विराट शेतकरी निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चा मध्ये शेतकरी बांधव माजी मंत्री गिरीष महाजन भाजप चे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चा मध्ये सहभागी होते 

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....