आनंद मावेना गगनी लोकप्रतिनिधी असावा तर प्रतापरावांसारखा



प्रतिनिधि ... नितीन इंगळे 
पाळधी खु येथील श्री बालकनाथ शंकर जगदाणे यांचा मुलगा चि.दिपक याचा विवाह चि.सौ.का.गायत्री हिच्याशी आज स्टॅटा वर पार पडला. 
आधीच गरीब परिस्थिती त्यात दिपकचे वडील बालकनाथ जन्मापासून मुके होते. म्हाताऱ्या आजीने मोठ्या कष्टाने दिपक ला शिकवले, मोठे केले. त्याला त्याच्या पायावर उभे केले आणि लग्न लावून दिले. 
जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी लग्नाला हजेरी लावून वधूवरांना शुभेच्छा दिल्या. प्रतापभाऊंनी आजीची गळाभेट घेतली.  म्हाताऱ्या आजीचा आनंद गगनी मावत नव्हता.  गरीबाच्या घरी लग्न असले तरीसुद्धा जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी हजेरी लावली याचे कौतुक दोन्हीकडच्या नातेवाईकांमध्ये सुरू होते. याप्रसंगी पाळधी खु चे युवासेना शहरप्रमुख मनोज माळी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....