जामनेर बोदवड रस्त्याने अज्ञात वाहणाने घेतला बीबट्याचा जीव
प्रतिनिधी .. नितीन इंगळे जामनेर येथील बोदवड रस्ताने अज्ञात वाहणाने बिबटयाला उडवले बीबट्या वाहणाच्या धडकेत जागीच ठार झाला ठोस मारणाऱ्या वाहणाने घटना स्थळावरूण पलायण केले रस्ताने जाणाऱ्या नागरीकांना हा प्रकार लक्षात आला रस्त्याला बीबट्या मृत अवस्थेत पडलेला दिसला वेळेचा विलंब ना करता नागरीकांनी वनविभागाला संपर्क साधून घटणेची माहीती दिली
जामनेर कडून बोदवडकडे जाणाऱ्या मार्गावर जामनेरपासून अंदाजे दिड किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली . अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे . या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले . जामनेर ते बोदवड मार्ग या राखीव वनक्षेत्राच्या अगदी लगत आहे . काही प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती वन खात्याच्या कार्यालयाला दिली होती .
ही माहिती मिळाल्यावर वन परिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित यांच्या सूचनेवरून वनरक्षक ठोंबरे , पी एस भारुडे , प्रशांत पाटील , वनपाल सुनील पाटील , प्यारेलाल महाजन , विकास गायकवाड , अशोक ठोंबरे वनमजूर चरणदास चव्हाण , विजय चव्हाण आदींनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला . या पथकाने बिबट्याचा मृतदेह वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात आणला . तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या मृतदेहाचे निरीक्षण केले . उद्या पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत व्यहारे हे या बिबट्याचे शवविच्छेदन करणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत .
या राखीव वन क्षेत्रात आणखी पाच बिबटे आहेत अशी माहिती वन खात्याकडून देण्यात आली . बिबट्यांसह या जंगलातील वन्यपशुंना मुक्तसंचार करता यावा , त्यांचा नैसर्गिक अधिवास माणसांकडून किंवा अन्य कोणत्याही कारणांनी बाधित होऊ नये म्हणून यापुढे उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे
Comments
Post a Comment