केकत निंभोरा येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत शिवरायाची लोकशाही या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप

जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत नमन फाउंडेशन व मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सुरेश तनपुरे यांच्या लिखित शिवरायांची लोकशाही या पुस्तकाचे वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे दीपक वारंगे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून खानदेश तेली महिला मंडळाच्या जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली चौधरी मराठा सेवा संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष योगेश पाटील तालुका अध्यक्ष सुनील कानडजे नमन फाऊंडेशनचे दशरथ पाटील रामभाऊ अपार जिल्हा उपाध्यक्ष सोनल जाधव तालुका सचिव माधुरी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनिता पाटील तर आभार प्रतिभा चौधरी यांनी मानले
याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी पालक शाळेतील सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....