जामनेर तालुक्यात पल्स पोलिओ मोहीम यशस्वी

जामनेर प्रतिनिधि (नितीन इंगळे)
जामनेर तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वी पणे राबण्यात आली.सकळी ८ वाजेपासून तालुक्यात २२६ पोलिओ बूथ ची स्थापना करण्यात आली होती. यासाठी ६२५ आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागाचे कर्मचारी यांनी कामकाज केले.जामनेर शहरात उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या द्वारे पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजून सर्व बूथ चे उद्घाटन करण्यात आले.यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून
४६३०० डोस प्राप्त झाले होते.
आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी ७३००० घरांना भेटी देऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी बोलावून आणले.
जामनेर तालुक्यात एकूण ३८१८२ बालकांना आज एकाच दिवशी पोलिओ डोस पाजण्यात आले.
वीटभट्टी, शेतात राहणारे, उतारकरू,खाडीमशिन साईड, पोहचण्यास अवघड भाग यासाठी ११ मोबाईल टीम नेमून लस देण्यात आली.
आज जे लाभार्थी काही कारणास्तव पोलिओ डोस घेऊ शकले नाही त्यांना एक दिवसाच्या खंडाने पुढील तीन दिवस पोलिओ डोस देण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....