पालकमंत्र्यांचे श्रीगणेशाला कोरोनामुक्तीचे साकडे

प्रतिनिधि .. नितीन इंगळे

 देवा श्री गणेशा जगावरील कोरोनाचे सावट लवकर जाऊ दे अन् सर्वांना सुखी समाधानी ठेव असे साकडे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी श्रीगणरायाला घातले. आज पालकमंत्र्यांच्या हस्ते श्री इच्छापूर्ती गणेश व महादेव मंदिरात आरती झाल्यानंतर ना. पाटील यांनी याबाबतचे साकडे घातले.

आज गणेश जयंतीनिमित्त नवीपेठेतील श्री इच्छापूर्ती गणेश व महादेव मंदिरात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सायंकाळी आरती करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक मनोज चौधरी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राधेश्याम कोगटा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आरती झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी श्री गणरायाला साकडे घालतांना कोरोनाची आपत्ती लवकरात लवकर जावी अशी प्रार्थना केली. कोविडच्या आपत्तीतही जिल्ह्यातील विकासाचा रथ अविरतपणे सुरू असून पुढील 


काळात सुध्दा याच प्रकारे विकास होईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तर नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....