शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण शिबिर


जामनेर प्रतिनिधी ( नितीन इंगळे )
जामनेर तालुक्यातील जि प केंद्रीय मुलांची शाळा पहूर येथे आज सकाळी शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते
या शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणाचे उद्घाटन गट शिक्षण अधिकारी जामनेर विजय सरोदे गटशिक्षणाधिकारी पाचोरा एन एफ चौधरी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अफजल खान पत्रकार गणेश पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अफजल खान हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख मार्गदर्शक गट शिक्षण अधिकारी विजय सरोदे  एन एफ चौधरी पंडित बाविस्कर बिडे सर केंद्रप्रमुख वराडे सर उपसरपंच राजू जाधव आदर्श शिक्षक लोकमान्य गटाचे गस सोसायटी चे उमेदवार संजय पाटील गजानन गवारे आदी मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गट शिक्षण अधिकारी विजय सरोदे गटशिक्षणाधिकारी पाचोरा एन एफ चौधरी बिडे सर पंडित बावस्कर पत्रकार गणेश पांढरे अध्यक्षीय भाषण अफजल  खान आदींनी मार्गदर्शन केले
यावेळी  केंद्र शाळेतील सांगवी खर्चणा लोढ्ररी शेरी पिंपळगाव तांडा हिवरी हिवरखेडा आदी गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन या प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक पंडित बाविस्कर यांनी तर आभार मुख्याध्यापक रवींद्र खोडपे यांनी मानले
शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जि प केंद्र शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र खोडपे वंजारी सर व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....