तळेगांव येथे श्रीराम व बालाजी मुर्तीची प्राणप्रतिष्टा सोहळ्याचे आयोजन... महाप्रसादाचा लाभ घ्यावा भाविकांनी
तळेगांव ता.जामनेर ता.३१ येथे श्री बालाजी संस्थान तळेगांव तर्फ श्रीराम, लक्ष्मणन, सिता, हनुमान,व बालाजी मुर्तीची प्राणप्रतिष्टा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन ता.४ एप्रिल रोजी सकाळी संपूर्ण गावात पालखी सोहळा कळस पुजन ता. ५ एप्रिल रोजी महायज्ञ तर ६ एप्रिल रोजी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान दरबार व श्री बालाजी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजन करण्यात आला असुन ६ एप्रिल रोजी सुपडू दशरथ पाटील यांचेकडून संपूर्ण गाव जेवण महाप्रसादाचे आयोजन केले असुन तळेगांव शेळगांव व परिसरातील भाविक भक्तांनी व ग्रामस्थनी पालखी सोहळा, महायज्ञ, प्राणप्रतिष्ठा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान बालाजी संस्थान चे अध्यक्षः- रमेश कोळी सचिवः- मुकुंदा पाटील सदस्यः- डॉ. गजानन जाधव, भागवत माळी, रामचंद्र कुंभार, अशोक सानप, सुपडू चौधरी, भास्कर जिरी, जनार्दन सोनार,भास्कर मंगळकर,नाना माळी व ग्रामस्थांन मार्फत करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment