श्रद्धा की अंधश्रद्धा .... महादेव मंदीर येथील नंदी पित आहे दुध ....
जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे ) एकाच दिवशी राज्यभर महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पित असल्याची चर्चा सोशल मीडिया माध्यमातून पसरली आणि मग काय सर्वत्र मंदिरात गर्दी अनेक ठिकाणी नागरिकांनी तसा प्रयत्न केला असून नंदी पाणी पीत असल्याची जोरदार चर्चा आहे दरम्यान,नुकतेच महाशिवरात्री पार पडली असून शनिवारी असाच एक प्रकार समोर आला महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पीत असल्याची माहिती गावभर पसरली नातेवाईकांनी राज्यभरात एकमेकांना फोन करून माहिती दिली आणि आपल्या परिसरातील मंदिरात हा प्रयोग करून पाहण्याचे सांगितले जामनेर शहरातील मोहण भुवण जवळील मंदिरात हा प्रकार सकाळी ११ वाजता सुरु झाला नंदीच्या मूर्तीला काही भाविकांनी चमच्याच्या साहाय्याने पाणी पाजून पाहिले एक-एक करता सर्वांच्याच हाताने नंदी पाणी पिऊ लागला.बघता-बघता भाविकांच्या रांगा लागल्या. घरून ग्लास, तांबे घेऊन लोक मंदिरात येऊ लागले. भगवान महादेवांच्या नावाचा जयघोष करीत नंदीला पाणी पाजू लागले. जळगाव जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. काहींनी हा प्रकार अंधश्रद्धा समजला तर काहींनी श्रद्धा समजून इतरांना देखील कळविले. महादेव मंदिर आणि शहरातील इतरही शिव मंदिरात भक्तानी पाणी व दूध घेऊन गर्दी केली आहे नंदीच्या मुखाजवळ चमच्यात भरलेल पाणी हळु हळु कमी होत असून हा परमेश्वराचा चमत्कारच असल्याचं मत काही भाविकांनी व्यक्त केलं आहे शहरात भाविकांनी शिव मंदिरात जाऊन नंदीच्या मूर्तीला दूध पाजण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे .
Comments
Post a Comment