चांद्यापासून बांद्यापर्यंत फडणवीसांना बजावलेल्या नाेटीसीची जामनेरात हाेळी भाजप आक्रमक


जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                                       जामनेर येथे आज दि .१३  भाजपच्यावतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी सुडबुध्दीने बजावलेल्या नोटीसीची होळी करण्यात आली यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत नोटीसीचा निषेध केला. भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावून सरकार सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे   भाजप चे चंद्रकांत बावीस्कर यांनी म्हटलं. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. नोटीसची प्रत जाळून या कारवाईचा निषेध करण्यात आला. "दुर्योधन आणि दु:शासन देखील म्हणत असतील, महाविकास आघाडी सरकार हमारा बाप है" अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली. घोटाळा शोधून काढणाऱ्या विरोधीपक्ष नेत्याला चौकशीच्या फे-यात अडकवल्याबद्दल भाजप पदाधिकारी यांनी संताप व्यक्त केला. घोटाळेबाजांना वाचवणा-या सरकार विरोधात रस्त्यावर उतरून निकराचा संघर्ष करण्याची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारने आपले घोटाळे अशाच पद्धतीने लपवण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप भाजपने केला यावेळी भाजपा जळगांव जिल्हा चिटणीस नवलसिंग पाटिल तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,जितेंद्र पाटील,अतिष झाल्टे,तुकाराम निकम,दिपक तायडे,बाबुराव हिवराळे, संजय सुर्यवंशी,व भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....