अवैधरित्या प्रवाशी वाहतूक देणाऱ्या दुचाकी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करु नये ….उप प्रादेशिक परिवहन अधिकारी - श्याम लोही

प्रवाशांची फसवणूक होउ नये या सुरक्षेच्या दृष्टीने बाईक टॅक्सी  व
अवैधरित्या प्रवाशी वाहतूक देणाऱ्या  दुचाकी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करु नये  
  महाराष्ट्र राज्यद शासनाने  अथवा  राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी अशा प्रकारचा कोणताही परवाना कोणालाही अद्याप जारी केलेला नाही. त्यामुळे याव्दारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, प्रवाशांची फसवणूक होउ नये तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाईक टॅक्सी व अवैधरित्या प्रवाशी वाहतूक देणाऱ्या दुचाकी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करु नये, तसेच अशा ॲपचा वापर करु नये, अशा वाहनांचा वापर मोटार वाहन कायद्याप्रमाणे बेकायदेशीर असून अशा वाहनांविरुध्द कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आहेत. तरी याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  श्याम लोही यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....