अबॅकस परीक्षेत शुभम चव्हाणचे विशेष प्रावीण्य.... महाराजांणी शुभम चा केला सत्कार



जामनेर:प्रतिनिधी ( नितीन इंगळे )
वेदिकस इंटरनॅशनल अकॅडमी तर्फे घेण्यात आलेल्या स्टेट लेवल कॉम्पिटिशनच्या अबॅकस परीक्षेत सहाव्या लेव्हल मध्ये येथील सरस्वती क्लासचा विद्यार्थी शुभम नटवर चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावला तसेच वैदिक गणितामध्ये दुसऱ्या लेव्हल ला द्वितीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे  श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी शुभमसह सर्व  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून आशीर्वाद दिला. सोबत  यावेळी शुभमचे वडील नटवर चव्हाण, राजेश नाईक, दिनेश चव्हाण, प्रवीण जाधव उपस्थित होते.

Comments