कसबा पिंपरी येथील शेकडो कार्यकर्ते व तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश

जामनेर/प्रतिनीधी- (नितीन इंगळे )
शिवसेना गटातील गटप्रमुख तसेच फत्तेपुर तोंडापूर जिल्हा परिषद गट प्रमुख तुकाराम सखाराम गोपाळ व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कसबा पिंपरी येथे अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 सर्वात आधी धडाडीचे रात्रंदिवस उन्हातान्हाची पर्वा न करता झपाट्याने आणि जोमाने काम करणारे गरीबांसाठी सतत धावणारे,व शासनाचे अनेक योजने बद्दल समस्या जाणून घेऊन कामे मार्गी लावणारे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शिवसेना गट प्रमुख तुकाराम सखाराम गोपाळ यांच्या वतीने आज रोजी  कसबा पिंपरी येथे रब्बानी तडवी, रवींद्र लोंगे, नजीर तडवी, उस्मान तडवी ,वजीर तडवी, श्रीकृष्ण मोरे,कसबा पिंपरी,गजानन राऊत मोसिन तडवी सक्रु दिन तडवी उल्हास भुसारी मस्तान तडवी आरिफ तडवी नीलेश राऊत नजीर तडवी यांनी
  शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 तालुक्यातील कसबा पिंपरी येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते पाळधी तालुका जामनेर येथील राजगडावर शिवसेनेत प्रवेश करून
हातावर शिवबंधन धागा बांधून , गळ्यात शिवसेनेचा रुमाल टाकून पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
 यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील मुकेश जाधव यांच्यासह फत्तेपुर तोंडापूर जिल्हा परिषद शिवसेना गट प्रमुख तुकाराम गोपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
 शिवसेना गटप्रमुख तुकाराम गोपाळ  यांच्या सहभागाने सर्वसामान्य जनतेची विविध शासकीय कामे केली जात असून त् आपला तुकाराम आपल्या दारी येत आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे पूर्ण करत आहे.
 युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजीत राजे पाटील समर्थक दादा डॉक्टर मनोहर पाटील एकच वादा मनोहर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना खेड्यापाड्यात, घरा घरात, गल्लीबोळात जाऊन आपला तुकाराम आपल्या दारी दिसत आहे.

Comments