इंधन दरवाढीविरोधात युवासेना आक्रमक, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे) महागाईच्या भडक्याने सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागतंय मोदी  सरकार काळात घरगुती गॅस, पेट्रोल ,डीजेल आदींच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने महागाईचा भडका उडल्याच्या निषेधार्थ युवासेनेच्या वतीने नगर पालिका चौकात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आल डिझेलने शंभरी पार केली असून पेट्रोल १२० रुपयांच्या पुढे गेले. तर घरगुती गॅस एक हजारावर गेले. या महागाईच्या भडक्याने, सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला मोदी सरकारची झोप उडविण्यासाठी व त्यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी नगरपालिका चौक येथे जामनेर थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले आंदोलनात जामनेर तालुका युवासेनेने सहभाग घेत जामनेर नगर परिषद चौकात थाळी नाद करुन व केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले यावेळी युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख ॲड.भरतजी पवार ,शिवसेना वैद्यकीय तालुका समन्वयक प्रा‌.ईश्वरजी चोरडिया,युवासेना तालुका कार्यकारिणी सदस्य मयूर पाटील,शिवसेना उपतालुका संघटक सुधाकर सराफ ,युवासेना तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव ,शिवसेना गटप्रमुख फत्तेपूर तोंडापुर तुकाराम गोपाळ, महिला आघाडी सदस्य मीना शिंदे,शिवसेना उपशहर प्रमुख कैलास माळी,सुरेश चव्हाण, दिपक माळी,युवासेना शहर कार्यकारिणी सदस्य अनस खान,जितू झाल्टे,मयूर राजपूत, ज्ञानेश्वर झोंड,नाना राठोड,देवराम जोशी यांच्यासह युवासैनिक-शिवसैनिक उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....