किरीट सोमय्या विरोधात शिवसेना आक्रमक; गुन्हा दाखल करा पोलीस निरीक्षक कीरण शिंदे यांना निवेदण

जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                                  भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला.आयएनएस विक्रांत  ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा करण्यात आलेल्या निधीत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप किरीट सोमय्या व नील सोमय्या यांच्यावर करण्यात आला आहे. हा निधी राजभवनामध्ये जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु अद्यापपर्यंत हा निधी राजभवनाला प्राप्त झाला नसल्‍याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी  शिवसेना प्रमुख डॉ मनोहर  पाटील यांनी पोलीस निरीक्षक कीरण शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही; तोपर्यंत शिवसेना आंदोलनात्मक भूमिका सुरू ठेवेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे यावेळी युवा सेना नेते विश्वजीतराजे पाटील ,जामनेर शहराध्यक्ष अतुल सोनवने ,युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख ॲड.भरतजी पवार ,शिवसेना वैद्यकीय तालुका समन्वयक प्रा‌.ईश्वरजी चोरडिया, उपतालुका संघटक सुधाकर सराफ ,युवासेना तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव ,शिवसेना गटप्रमुख फत्तेपूर तोंडापुर तुकाराम गोपाळ, उस्माणभाई , विशाल लामखेडे, महिला आघाडी सदस्य मीना शिंदे,शिवसेना उपशहर प्रमुख कैलास माळी,सुरेश चव्हाण, दिपक माळी,युवासेना शहर कार्यकारिणी सदस्य अनस खान,जितू झाल्टे,मयूर राजपूत, ज्ञानेश्वर झोंड,नाना राठोड,देवराम जोशी यांच्यासह युवासैनिक-शिवसैनिक उपस्थित होते



Comments