सावित्रीबाई फुले विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा ;जयश्री चव्हाण प्रथम तर रुपाली माळी द्वितीय



प्रतिनिधि [ नितीन इंगळे )पहूर , ता .जामनेर येथील  महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेत  जयश्री चव्हाण हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला .रूपाली माळी हिने द्वितीय , निखिल पांडव याने याने तृतीय तर  अनिकेत जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला . विजेत्यांना शंकर भामेरे लिखीत  'समतेचे शिलेदार ' पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले .
     उपमुख्याध्यापिका कल्पना बनकर यांच्या अध्यक्षतेखाली वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .स्पर्धेचा निकाल मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे यांनी जाहीर करून विजेत्यांचे अभिनंदन केले . या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला .प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले .यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....