जामनेर पोलीसांनी काढला जामनेरात रुट मार्च
जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कीरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पोलिसांनी रूट मार्च काढला. रमजान, शिव, बसव जयंती सर्व सण एकाच वेळी आले असल्याने पोलिसांची कसोटी लागली आहे. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैणात असणार आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे. जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधील सर्वसामान्य नागरिकांनी घाबरून न जाता सण आनंदी वातावरणात साजरा करावा, कोणत्याही व्यक्तीकडून कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जामनेर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी जामनेर पोलीस कर्मचारी व होमगार्ड या संचलनलयात सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment