यंदाही.....आमदार गिरीष महाजन करणार नाही वाढदिवस साजरा

 प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                                           १७ मे रोजी आमदार गिरीष महाजन यांचा वाढदिवस आहे महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती बघता वाढदिवसाच्या जाहिराती, फलक, पुरवण्या आदी गोष्टीवर खर्च न करता दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना मदत करा त्याच मला अनमोल शुभेच्छा आमदार गिरीष महाजन हे पत्रकार परीषद मध्ये बोलत होते   जामनेर येथे आमदार गिरीष महाजन यांच्या निवाासस्थानी  आज दि १३ रोजी ठिक सायंकाळी ६ वाजता  पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश येणाऱ्या १७ तारखेला आमदार गिरीष महाजन यांचा वाढदिवस असून आमदार गिरिष महाजन यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले कोणीही बॅनर लावू नये जाहीरात करू नये वाढदिवस साजरा करायचा असेल तर गोरगरीबांना मदत करा रक्तदान शिबीराचे आयोजन करा जे अत्यंत गरजू व्यक्ती असेल अशा लोकांना मदत करा कुठल्याही प्रकारचे वायफाळ खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार असल्याचे आमदार गिरीष महाजन यांनी सांगितले  यावेळी डॉ .प्रशांत भोंडे , शरद पाटील, गोलू झाल्टे, दिपक तायडे, चंद्रकांत बावीस्कर, महेंद्र बावीस्कर, जितू पाटील, भाजप पदाधिकारी उपास्थित होते

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....