सर्पदंश झाल्याने चिमुकलीचा मूत्यू

(नितीन इंगळे)

  तळेगाव ता. जामनेर ता.२६ येथील श्री. खंडू माणिक पाडोळसे (कोळी)  हे आपल्या लहान मुलाला निमोनिया झाल्यामुळे  अथर्व हाँस्पीटल ला मुलाला ऍडमिट केले होते. असे असताना आज दिनांक  ता.२६ रोजी रात्री १२ः३० वाजता चिमुकली कुमारी रोहीणी खंडू पाडोळसे (कोळी)वय ४वर्ष ही  झोपेत असताना  तिला विषारी संर्प दोष झाल्‍यामुळे गतप्राण झाल्या. प्रथम उपचार म्हणून डॉ. एम.बी. चौधरी यांच्याकडे नेले असता त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल जामनेर येथे नेण्याचे सांगितले मात्र तळेगाव - जामनेर दरम्यान  रस्त्याने जात असताना चिमुकली रोहिने यांनी अर्ध्या रस्त्यातच आपले प्राण सोडले सिव्हिल हॉस्पिटल जामनेर येथे दाखवले असता  डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले. एकीकडे लग्नाची घाई तर दुसरीकडे मुलाला निमोनिया असल्यामुळे दवाखान्यात ऍडमिट असल्यामुळे चुमकलीचे आई वडील दावखाण्यात होते. चिमुकली कु.रोहिणी ही आत्याकडे होती. घटनेमुळे पाडळसे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....