सांडपाण्यामुळे स्मशानभूमी मागील राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे ) जामनेर शहरातील स्मशानभूमी मागील राहणाऱ्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याला चेंबर चे काम पूर्ण झाले असून तिथेच काही चेंबर मधून सांडपाणी बाहेर वाहत असल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. दूषित सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे डासांच्या संख्येत वाढ झाली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे तेथील नागरीकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे नागरिकांच्या हिताचे कार्य करण्यात यावे. नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे लोकांना असह्य त्रास होत असून, त्यांना प्रथम प्राधान्य देऊन समस्यांचे समाधान करण्यात यावे त्यातच या पाण्यामुळे रोगांचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला असल्याने नगरपालिकेने तात्काळ ही समस्या सोडवावी अशी मागणी नागरीक करत आहेत
Comments
Post a Comment