जामनेर तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली=खासदार धैर्यशिल माने


जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे)
शिवसैनिक हा धगधगता निखारा असून शिवसेनेच्या भगव्याखाली सर्वानी मतभेद बाजूला सारून एकनिष्ठपणे एकत्र येवून जोमाने कामाला लागा , प्रत्येक शिवसैनिकाने सैनिकाप्रमाणे कार्य करा असे आवाहन शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केले .
आगामी जि प, पंचायत समिती व पालिका निवडणुकीत शिवसेना पक्ष आणखी बळकट करण्यासाठी तसेच संघटनात्मक बांधणीसाठी तालुक्यातील प्रत्येक गावात, वॉर्डात यासह घराघरात शिवसेना व त्यांचे कार्य पोहचवीण्या करीता शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे . या अनुषंगाने येथील पाळधी येथील शिवसेना राजगड कार्यालयात आयोजित शिवसेना रावेर लोकसभा मतदार संघ पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करतांना खा माने यांनी शिवसैनिकाना आवाहन केले .
यावेळी व्यासपीठावर जिल्हयात 
संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख आ चंद्रकांत पाटील, पक्ष निरीक्षक आबासाहेब पतंगे, मिलिंद रावराणे साहेब, जळगाव शहर महानगर प्रमुख गजानन मालपुरे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख विश्वजित पाटील युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य विराज कावडिया, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ मनोहर पाटील, उत्तम सुरवाडे यांच्यासह शिवसेना, युवासेना
संपर्क अभियानासाठी आलेले पदाधिकारी उपस्थित होते .
जामनेर शिवसेना पदाधिकारी यांचेसह माजी शिवसैनिक आदिनी प्रमुख पाहुणे व मान्यवराचे स्वागत केले .
शब्दाना विचारांची जोड़ मिळते तेव्हा बाळासाहेब तयार होतात असे मार्मिक विचार मार्गदर्शन करतांना खा. माने यांनी सांगुन जामनेर मतदार संघात शिवसेनेचे कार्य अतिशय चांगले असल्याची पावती दिली . प्रतिकुल परिस्थिती असताना सुद्धा त्यावर मात करून आजही शिवसेनेचा भगवा या मतदार संघात डौलाने फडकतोय ही अभिमानाची बाब आहे . यापुढे सुद्धा गावगावात व घराघरात शिवसेना पोहचवा शिवसेना बळकट व्हावी , पदाधिकारी यांना बळ मिळावे म्हणून एकसंघ होवून कार्य करा , मतभेद व मनभेद मिटवून समन्वय व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करा असे आवाहनही यावेळी केले . शिवसेना एक परिवार आहे मातृसंस्था असून शिवसैनिक व पदाधिकारी यांच्यात अंतर असता कामा नये, जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करा पक्षात नव्याने सहभागी होणाऱ्यांचे स्वागत करा पक्षात शिवसैनिक मुळ गाभा आहे . व्यक्त होताना पक्ष वाढीसाठी व्यक्त व्हा , भगव्या विचारांचे भगव्या झेंड्याखाली कसे येतील याचा विचार करून कार्य करा अंधकार भेदून दुवा व दिवा म्हणून काम करा अश्या सूचना खा माने यांनी करून मार्गदर्शन केले .
शिवसंपर्क अभियान पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नवीन ऊर्जा देण्यासाठी सुरु केलेले अभियान असून 80 टक्के समाजकारणा प्रमाणे 20 टक्के राजकारण समजून घ्या 20 टक्के राजकारणातिल अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हय्यात टीम आलेली आहे यात 5 विधानसभा व 10 स्थानिक समिति लोकाधिकार समिति सदस्य आहेत गेल्या 2 दिवसांपासून कार्यरत आहे यात माझा रोजगार माझा अधिकार प्रचार व प्रसार करीत असल्याचे मान्यंवरानी मनोगतात व्यक्त केले . कार्यक्रमाला युवासेना उपजिल्हाधिकारी विश्वजित पाटील, शिवसेना जिल्हा संघटक सांडू गुरव, विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील, माजी युवासेना उपजिल्हाप्रमुख ॲड भरत पवार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका समन्वयक ईश्वर चोरडिया, युवासेना तालुका प्रमुख विशाल लामखेडे, शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्या गुजर, जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे, यांच्यासह इतर शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments