जामनेर विविध कार्यकारी सहकारी संस्था चेअरमन पदी राजेंद्र भोईटे तर व्हाईस चेअरमन पदी नाना माळी यांची एक मताने निवड...

जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                            जामनेर  विविध कार्यकारी सहकारी संस्था जामनेर ची पंचवार्षिक निवडणूक 17 एप्रिल ला पार पडली या निवडणुकीत भाजपा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या सहकार पॅनल राष्ट्रवादी शिवसेनेच्या शेतकरी पॅनलचा पार सफाया करत एक हाती सत्ता मिळवली सहकार पॅनेलचे नेतृत्व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी केले तर शेतकरी पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे संजय गरुड यांनी केले अतिशय प्रतिष्ठेची झालेली निवडणूक सहकार पॅनल जिंकली. आज या संस्थेच्या चेअरमन व व्हाइस  चेअरमन पदासाठी विशेष सभेचे आयोजन निवडणूक निर्णय अधिकारी  डी व्हि पाटील यांनी केले होते. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून चेअरमन पदासाठी राजेंद्र रघुनाथ भोईटे तर व्हाईस चेअरमन पदासाठी नाना केशव माळी हे दोनच अर्ज आल्याने दोघांची एक मताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डी व्ही पाटील यांनी जाहीर केले निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत माजी तालुकाध्यक्ष जगन दादा लोखंडे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा  संचालक प्रदीप गायके यांनी केले तर जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती छगन दादा झाल्टे जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जीतू पाटील नगरपरिषद गटनेते नगरसेवक डॉक्टर प्रशांत भोडे नगरसेवक आतिश झाल्टे दत्तात्रय दामोदर सोनवणे बाजीराव वाघ राजेंद्र महानोर गोलू झाल्टे नितेश बोलते नंदू सुरडकर अमोल पर्वते यांनी केले यावेळी माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक विजय दामोदर सोनवणे, गोपाल पाटील सर,पांडुरंग माळी ,देवराम चौधरी, गोविंदा विष्णू धनगर ,जावेद आ. वाहेद, स्नेहांकिता जगन्नाथ लोखंडे, माधुरी दिनेश लखोटे, जगन सुरडकर हे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. संस्थेचे सचिव निकम, लिपिक नामदेव माळी, शिपाई बाळासाहेब नेमाडे हजर होते

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....