फलटण येथे महाराष्ट्र दिना निमित्त सुवर्णस्पर्श फाउंडेशन मार्फत रक्तदान शिबिरांचा कार्यक्रम संपन्न

(जामनेर प्रतिनिधि ) 
1 मे 2022 (महाराष्ट्र दिन  )
या दिवशी कामगार दिनाचे औचित्य साधून  सुवर्णस्पर्श फाऊंडेशन या संस्थेने ब्लड बँक फलटण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे.सध्याच्या काळात रक्ताचा फारच तुटवडा आहे गरजू पेशंटला पाहिजे असलेल्या ब्लड ग्रुप साठी खूप प्रयत्न करावे लागतात.तेव्हाच त्या रक्ताची किंमत समजत असते.जगात सर्व  अवयवांचे प्रत्यारोपण करता येते पण रक्ताचे प्रत्यारोपण करता येत नाही याची जाणीव ठेवून प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि प्रत्येक रक्तदाता हा महानच आहे.या शिबिरासाठी एकूण 39 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पठाण मॅडम यांनी व्यक्त केले तसेच येथून पुढेही प्रत्येक तीन महिन्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासनही दिलेआणि प्रत्येक रक्तदाता हा आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे असेही त्या म्हणाल्या ,तसेच यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ रुपाली कुचेकर.यांचाही सहभाग दिवसभर होता..श्री सुखदेव फुले यांचे सहकार्य ही या कार्यक्रमासाठी लाभले.तसेच ब्लड बँक फलटण यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....