माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घुण हत्या करणार्या मारेकर्यांना कठोर शिक्षा करा-माहिती अधिकार कार्यकर्ता संघ जामनेर




जामनेर प्रतिनिधी २५/५/२०२२ 

  माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा द्या व हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियास दहा लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करा अश्या स्वरूपाचे निवेदन आज जळगाव जिल्हा मुख्यप्रचारक दादाराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तहसीलदार यांना देण्यात आले.

    यवतमाळ जिल्हा घाटंजी तालुक्यातील पारवा या गावातील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची १५ मे २०२२ रोजी मध्यरात्री अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.

माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती मागीतली म्हणून सूड भावनेने सदर क्रूर हत्या झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासातून आणि प्रसार माध्यमातून समोर आले आहे.

  सदर घटना ही धक्कादायक असून महाराष्ट्रांच्या प्रागतिक परंपरेला काळीमा फासणारी आहे.शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त,लोकाभिमूख व पारदर्शक चालावे म्हणून काम करणाऱ्या हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे जागरूक व संवदेनशील नागरिकांचे मनोधर्य खच्ची करणारी सदर घटना आहे.

  सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघमहाराष्ट्र यांनी शासन दरबारी पुढील मागण्या केल्या, १.मृत अनिल देवराव ओचावार यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषी आरोपीना सहा महिन्याच्या आत कठारातील कठोर शिक्षा मिळावी. २.या प्रकरणात व कटात सामील असू शकणारे व अपराध्याला चिथावणी देणारे सरकारी अधिकारी व सूत्रधार यांच्याही मुसक्या अवळाव्यात आणि त्यांना आरोपी करून कसून चौकशी करावी. ३.माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जीव घोक्यात घालून काम करून प्रशासन व शासन पारदर्शक चालावे म्हणून आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या मृत कार्यकर्ता अनिल देवराव ओचावार यांच्या कुटुंबियांना किमान दहा लाख रूपयांची अर्थिक मदत सरकारने जाहिर करावी. । ४.माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धमक्या देणेहल्ले करणेमारहाण होणे व त्यांच्या हत्या होणे अशा घटनांमध्ये वारंवार वाढ होत आहे.ही प्राशासनाने लक्षात घ्यावी .माहिती अधिकार कार्यकत्यांची सुरक्षा व सरंक्षण या सबंधी शासनाने धोरणात्मक उपाययोजना अंमलात आणाव्या .    शासनाने या संबंधी कडक उपाय योजना कराव्यात. ५. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आवश्यक तेथे तातडीने पोलीस संरक्षण मिळणे अत्यावशक आहे. वरील मागण्यांचा प्रशासनाने गंभीरपणे विचार करून अंमल बजावणी करावी अश्या स्वरुपाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी विशेष उपस्थिती जळगाव जिल्हा मुख्यप्रचारक दादाराव वाघ , बाळू भिमराव वाध  ,मिना लक्ष्मण शिंदे, प्रिती हरेश्वर कुमावत ,पवन सावळे ,महेश विसपुते उपस्थित होते  

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....