जामनेर माळी गल्ली ...अंध प्रशासनाच्या आंधळ्या कारभारामुळे गटारीत पडले युवक....
प्रतिनिधि( नितीन इंगळे ) जामनेर येथील माळी गल्ली मध्ये जाणाऱ्या रस्त्याचे गटारीचे काम सुरू आहे दोन युवक गटारीत मोटरसायकल सह पडून जखमी झाल्याची अत्यन्त धक्कादायक घटना घडली आहे जामनेर शहरात बसेर मेडीकल जवळ नेहमीच ट्राफिक जाम होत असते.त्यातच गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याचे व गटारीचे काम अत्यन्त संथ गतीने सुरू आहे. त्यातच बसेर मेडीकल समोर असलेल्या गटारीवरील ढापा गायब झाला आणि त्या मोकळ्या गटारीत काल दोन युवक मोटरसायकल सह पडले.सदर अपघात हा नगर परिषद दुर्लक्षाने मुळे झाला असून आता किती लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागतो ते पाहणे गरजेचे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि न प लोकांचे बळी घेणार आहे का असा संतप्त प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे.दुर्घटनेनंतर युवकांना गटारीबाहेर काढण्यासाठी परिसरातील रहिवाशी सरसावले आणि दुचाकीही बाहेर काढण्यात आली. यानंतर जखमी युवकांना तात्काळ उपचारार्थ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले गटारीचे काम गेल्या महिन्यापासून या खोळंबले आहे. अर्ध्याहून अधिक रस्ता कोसळलेल्या बुरूजाच्या दगड, मातीने व्यापला आहे. या ठिकाणी दिवसातून दहा वेळा वाहतुकीची कोंडी होते. दुचाकीस्वार इतर वाहनांचा जबरदस्त खोळंबा येथे होतो. गटार आजूबाजूला दगड,माती आणि वाढती ट्राफिक यामुळे येथे नेहमीच अपघात ही होत असतात.ही वाहतुकीची कोंडी ह्या दोन युवकांच्या जीवावर उठली होती.यावर कायमस्वरूपी मार्ग निघणे आवश्यक आहे.सदर गटारीवर तात्काळ दुरूस्त करण्यात यावी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरीी कांना गटारीीवरूण उडी मारूण तारेवरची कसरत करावी लागत आहे पावसाळ्यात किंवा इतरवेळी ; गटारी तुंबतात त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. या अपघातास जामनेर न प प्रशासन, कारणीभूत असून ताबडतोब ह्या भागातील रस्त्यावरील कचरा बाजूला करणे,रस्ता मोकळा करणे,गटारीवर ढापे टाकणे आवश्यक आहे.या अपघातानंतर तरी अंध प्रशासन जागे होईल का असा प्रश्न देखील जनता विचारत आहे.
Comments
Post a Comment