माणुसकीचं दर्शन!ट्रकच्या धडकेत मृत पावलेल्या माकडाची काढली तळेगांव शेळगाव गावातील नागरीकांनी अंत्ययात्रा

  

प्रतिनिधि( नितीन इंगळे                                                                                                                                  तळेगाव ता.जामनेर तळेगांव/शेळगाव येथे माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना गावकऱ्यांच्या सहकार्याने घडली असून अज्ञात ट्रकच्या धडकेने मृत पावलेल्या माकडावर गावातील जागरूक नागरिकानी अंत्यविधीसह तिसऱ्या दिवशी सारी, सातव्या दिवशी दशक्रिया विधी तर  तेरवी चा सुध्दा कार्यक्रम  समस्त  बेलेश्वर नगर कै.युवराज पाटील शळेगाव यांच्या राहत्या घरुन करण्यात आला  मांसातली माणूसकी विसरलेल्या लोकांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. आजच्या  घडीला  लोक माणसा- माणसा पासून दुर जात असताना मात्र तळेगांव/शेळगाव वासियांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.. योग्य ती दक्षता घेऊन माणुसकी देखील जपायची आहे. म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हेच जीवनाचे खरे सत्य आहे. मनोज पा अमोल झटकवळे, रामलाल महाजन, पाटिल , मगंल जिरी ,दिलीप भोरकळे, जालीदर पाटील, भास्कर पाटिल,सदिप पाटिल, समस्त  बेलेश्वर नगर शळेगाव याच्या उपस्थित दशक्रिया विधीत, केस दिले तर समस्त  बेलेश्वर नगर शळेगाव यांनी  वरगणीतुन तेराव्याचा गावातील २५० लोंकाचा पंगतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....