सोनाळे गावात गॅस सिलेंडरचा स्फोट;जवळपास एक दोन लाखांचा घरगुती सामान जळून खाक

    प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                                              सोनाळे ता. जामनेर  येथील एका मजुराच्या घरात अचानक गॅसचा स्फोट झाला. यात एकूण एक दोन लाखांचा घरगुती सामान जळून खाक झाले आहेत. सुदैवाने घटनेत जीवितहानी झाली नाही जामनेर तालुक्यातील सोनाळे येथील नामदेव कडू मराठे हा मजूर असून मजूरी करून कुटुंबाचा उपनिर्वाह भागवत असतो नामदेव हे नुकतेच मजुरी करून घरी परतले होते. त्यांच्या घरातील महीलेनी आज  ९ जुन सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसचा स्फोट  झाला. यावेळी घरातील संसार उपयोगी वस्‍तूंचा कोळसा झाला सिलेंडरच्‍या स्‍फोटात  बाजरीचे धान्य, घरातील घरगुती सामान  असे एकूण एक दोन लाख रुपयांचे सामान जळून खाक झाले. सदर घटना गुरुवार ९ जुन रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे  तत्पूर्वी मराठे कुटुंबाचे संसार पूर्णतः उद्धवस्त झाला आहे. मदतीची आस धरून बसलेल्या या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....