एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची संधी; जामनेरात समर्थकांनी फटाके फोडले

प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                                                               दोन वर्षांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने विधानपरिषदेची मोठी संधी मिळाली आहे जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. खडसे यांनी आज दुपारी मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जामनेर मध्ये त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला नगर परिषद जवळील चौफुली समोर  खडसे समर्थकांनी एकत्र येत मोठया जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी केली दोन वर्षांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने विधानपरिषदेची मोठी संधी मिळाली आहे. विधानपरिषदेसाठी खडसे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने खऱ्या अर्थाने एकनाथ खडसे यांना न्याय दिला, अशी भावना यावेळी खडसे समर्थकांनी व्यक्त केली. भाजपने खडसेंना सतत डावलण्याचं काम केलं, पण राष्ट्रवादीत आल्यानंतर शरद पवारांनी खडसेंचं पुनर्वसन केलं, असेही जल्लोष करताना काही जण म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....