जामनेर तालुका ग्रामोद्योग संस्थेच्या चेअरमन पदी प्रल्हाद सोनवणे तर व्हा चेअरमन पदी सूपडू महाजन
जामनेर (प्रतिनीधी) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ अंगीकृत श्री समर्थ औद्योगिक बहुउद्देशीय विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संस्था जामनेर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 2014 च्या अधिनियम19 प्रमाणे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या सहकारी संस्थेचे सन 2022 ते 2027 कालावधीचा निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी एस आर तायडे यांनी घेतल्यानुसार दिनांक02/06/22 ते 08/06/22 दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती त्यानुसार संस्थेच्या 11 सभासदांनी नामनिर्देशन पत्र सादर केले होते त्यानुसार माघारीची मुदत संपल्यानंतर संस्थेचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले त्यामध्ये नवनियुक्त संचालक म्हणून सोनवणे प्रल्हाद बळीराम ,चांभार चंद्रसिंग देवसिंग, वारंगे भीमराव पंढरीनाथ, माळी संजय देवराम, महाजन सुपडू काशिनाथ, वाघ प्रमोद दयाराम, राजपूत जितेश
हुलसिंग, सोने विठ्ठल विश्वनाथ, लोखंडे मिलिंद शरद, माळी मंगला पुंडलिक, सोनवणे मंगलाबाई प्रल्हाद यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर आज दिनांक 01/07/22 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एस आर तायडे यांनी संस्थेच्या कार्यालयात चेअरमन व व्हॉईस चेअरमन निवड कार्यक्रम घोषित केला होता त्यानुसार संस्थेच्या कार्यालयात सर्वानुमते एकमताने संस्थेचे चेअरमन म्हणून श्री प्रल्हाद बळीराम सोनवणे यांची तर व्हा चेअरमन पदी सुपडू काशिनाथ महाजन यांची सर्व संचालकांनी एकमताने निवड केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस आर तायडे यांनी जाहीर केले या निवडी प्रसंगी सर्व संचालकांनी चेअरमन प्रल्हाद सोनवणे व्हाईस चेअरमन सुपडू महाजन यांचा सत्कार केला याप्रसंगी संस्थेचे माजी चेअरमन, संचालक संजय माळी, प्रमोद वाघ सचिव एस जी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Comments
Post a Comment