गुरुपौर्णिमेनिमित्त लिटिल नेस्ट माय छोटा स्कूल येथे कार्यक्रम साजरा

 प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                                        गुरुपौर्णिमेनिमित्त लिटिल नेस्ट माय छोटा स्कूल मध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक चळवळीत पहिल्या गुरुची पूजा करण्यात आली. त्यासोबत आपले आई-वडील हे सुध्दा आपले प्रथम गुरू आहेतं. त्यांचा मान-सन्मान त्याचबरोबर आई-वडिलांच्या प्रमाणे आपले सर्व शिक्षक, समाज यांच्याबद्दल सुद्धा आपल्या मनात आदरभाव, सर्वाप्रती प्रेमभावना निर्माण होणे आवश्यक आहे , हीच आपली आजची गुरुदक्षिणा असेल  एक सु-संस्कारित समाज कधी उभी राहील ज्या वेळी सु-संस्कारित पिढी उभी राहिलं तेव्हाचं लिटिल नेस्ट माय छोटा स्कूल चे द्येय सार्थक होईल. असा संदेश संस्थेचे अध्यक्ष श्री.राहुल चव्हाण यांनी दिला.अतिशय सुंदर असा कार्यक्रम गुरुपौर्णिमा निमित्ताने शाळेत आयोजित करण्यात आला.संपूर्ण शहरात नवीन ओळख लिटिल नेस्ट माय छोटा स्कूल ची होत आहे.कार्यक्रमाला शिक्षक वृंद,शिक्षेकत्तर कर्मचारी, पालक या सर्वांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....