जामनेर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम – नगर परिषद चा दणका
प्रतिनिधि ( नितीन इंगळे ) जामनेर शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची होत असलेली कोंडी तसेच पादचा-यांना साधे रस्त्यावरुन चालणे अवघड झाल्याने जामनेर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी आज पोलीस बंदोबस्तात भुसावळ रोड नाल्यावरील व जुना बोदवड रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरु केल्याने व्यापा-यात खळबळ माजली आहे.दरम्यान अतिक्रमण हटवण्याची मोहीम संपुर्ण शहरात राबविणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली जामनेर शहर हे व्यापार पेठ व शैक्षणिक संस्थानाचे जाळे असलेले शहर असल्याने नेहमीच वर्दळ रहाते शहरात बसस्थानक गांधी चौक अन्नाभाऊ साठे चौक ते जळगांव रोड भुसावळ रोड पाचोरा रोड मोठा तिन मुख्य रस्ते आहेत.हे तिन रस्ते अरुंद असल्याने व नगरपालिकेच्या मालकीच्या नाल्यावर रस्त्यावर गेल्या ब-याच वर्षापासुन दुकान मालकांनी व घर मालकांनी अतिक्रमन करुन आपला व्यवसाय सुरु केला होता.त्यातच नाल्यावर व रस्त्यावर दुकानातील सामान ठेवल्याने वाहतुकीस कोंडी होऊन रहदारीस अडथडा निर्माण होत होता.दुकानदाराचे व ग्राहकांचे दुचाकी वाहनेही रस्त्यावर अडवे तिडवे लावल्या जात असल्याने पादचा-यांना साधे चालणे मुश्किल होत होते.तर वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावे लागत होते.बस स्थानक ते गांधी चौक या मेन रोडवर तर हातगाडे वाले,किरकोळ भाजीपाला विक्रते,फळ विक्रते मंडळी,बागवान मंडळी रस्त्यावर मध्यभागी थांबवून बस्तान मांडुन बिनदिक्कत व्यवसाय करतात त्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.याच रस्त्यावर जि.प.हायस्कुल मुलींचे व मुलांचे शाळा असल्यामुळे विद्यार्थिनींना जिव मुठीत धरुन,धक्के सहन करत मार्गक्रम करावा लागतो.ब-याच वेळेस अपघातही झाले.त्यामुळे जामनेर नगर परिषद मुख्याधिकारी याच्यां मार्गदर्शनाखाली अतिक्रमण असणाऱ्या मंडळीना दोन दिवसापासुन पुर्व सुचना,नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याची सुचना केली.मात्र व्यापा-यांनी नालीवरील व रस्त्यावरील अतिक्रमण काढुन न घेतल्याने मुख्याधिकारी यांनी आज दि. १६ सकाळी सात पासुनच मेनरोड वरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढन्याचा धडाका सुरु केला.ज्या व्यापारानी अतिक्रमन काढले नाही त्यांचे साहित्य जप्त करन्यात येत आहेत.अतिक्रमन काढन्यासाठी पोलीस निरक्षक कीरण शिंदे यानी आपल्या सहका-यासह बंदोबस्त ठेवला नगर परिषदेच्या जागेत कोणी अतिक्रमण करत असेल तर त्यास नोटीस न देता नपाच्या वतीने अतिक्रमण काढून टाकण्यात येईल असे मुख्याधिकारी,नगर परिषद जामनेर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment