तळेगाव वि.का.सोसायटीच्या इतिहासात प्रथमच निवडणूक शेतकरी पॅनलचा दहा जागा जिंकत विजय २३९ पैकी १८० सभासदांनी बजावला मतदानाचा हक्क
तळेगाव ता.जामनेर ता.११येथिल विकास सोसायटीत तब्बल १० जागा जिंकून शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख नंदू पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले . तळेगाव येथील विकास सोसायटीची बहुचर्चीत निवडणूक. सुमारे पन्नास वर्षाच्या इतिहासात प्रथमच निवडणूक पारपडली अनेकांचे लक्ष या निवडणुकीवर होते अनेकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती संस्थेचे एकूण मतदार २३९आहेत त्यापैकी १८० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात १६७ मत वैध ठरले तर १३मत बाद सर्वात जास्त मत उत्तम तुळशीराम राऊत यांना ९२ मत आहेत निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या अगोदरच तीन जागा विमलबाई पाटील मथुराबाई कोळी युवराज वंजारी बिनविरोध निवडून आलेल्या होत्या .
उर्वरित दहा जागांसाठी आज मतदान झाले . त्यात शेतकरी विकास पॅनलच्या ७ जागा निवडून आल्या त्यात पॅनल प्रमुख नंदू पाटील , अरुण घोरपडे , भरत कोळी , कौतीक माळी , संतोष माळी , शांताराम – कुंभार , महादू माळी हे विजयी झाले तर विरोधी पॅनलच्या ३ जागा त्यात उत्तम राऊत , संजय राऊत , आत्माराम कोळी हे विजयी उमेदवार आहेत . बहचर्चित ठरलेली या निवडणूकीने अनेक नवीन चेहऱ्यांना सोसायटीमध्ये संधी दिली आहे. तर अनेक मातब्बरांना पराभव पत्करावा लागला आहे . शेतकरी विकास पॅनलचे पॅनल प्रमुख नंदू पाटील व नाना माळी, संतोष माळी, अरुण घोरपडे ,युवा वंजारी,आकोश कोळी,भरत कोळी, भिका माळी,आदींनी परिश्रम घेत सोसायटीवर एकतर्फी विजय मिळवला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय पाटील यांनी काम पाहिले तर केंद्राध्यक्ष म्हणून अनिल पाटील हे होते. यावेळी त्यांना सचिव दिलीप चौधरी संस्था कर्मचारी पंकज माळी यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment