खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने शालेय गरीब मुलींना दप्तर वाटपाचे आयोजन

प्रतिनिधि ( नितीन इंगळे ) 

जामनेर - खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुक्याचे अध्यक्ष श्री अजय अशोक चौधरी यांची मुलगी कु.ईशिका हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार दि. २७ रोजी शालेय शिक्षण घेणाऱ्या गरीब मुला- मुलींना शालेय दप्तर वाटप करण्यात येणार आहे. जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हे दप्तर वाटप करण्यात येतील.
खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष अजय अशोक चौधरी यांनी केले असून संपूर्ण तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारणी त्यांना सहकार्य करीत आहे. अजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या असून *बुधवार दि.२७ रोजी* जामनेर शहर व तालुक्यातील पदाधिकारींनी मोयखेडा दिगर या.जामनेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपस्थित राहावे असे आवाहन खान्देश तेली समाज मंडळाचे आणि प्रदेश तेली महासंघाचे नवयुवक जामनेर तालुकाध्यक्ष अजय अशोक चौधरी यांनी केलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....