जामनेर बांधकाम विभागातील घोडके साहेब व पंचायत समीती सहाय्यक अधिकारी के.बी. पाटील यांच्या सेवापुर्ती निमित्ताने निरोप सत्कार समारंभ कार्यक्रम सपन्न


प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                                            आज पंचायत समिती येथे बांधकाम विभागातील  घोडके साहेब व पंचायत समिती येथे कार्यरत असलेले के . बी . पाटील यांच्या सेवापुर्ती निमित्ताने  निरोप समारंभ कार्यक्रम करण्यात आला या वेळी  जामनेर नगरीच्या नगरध्यक्षा सौ साधनाताई महाजन   गटविकास अधिकारी डॉ राजेश सोनवणे  उपस्थित होते. बांधकाम विभागातील कार्यक्षम घोडके साहेब व के . बी. पाटील यांनी भरपूर वर्षे सेवा केली सेवा करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासली सेवापूर्ती निमित्ताने त्यांच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंता सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने जामनेर पंचायत समिती येथे उपस्थित होते सेवापुर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी मित्रपरिवार  यांनी केला अनेक मान्यवरांनी त्यांच्या कामाची पावती आपल्या मनोगतातून व्यक्त केली सत्काराला उत्तर देतांना घोडके साहेेब म्हणाले आज कामाची पावती म्हणून सर्व स्तरातून माझ्यावर प्रेम करणारे बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याच्यासारखा मोठा आनंद नाही. बांधकाम क्षेत्रात काम करत असताना मी कधीही नकारात्मक विचार केला नाही माझ्याजवळ आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम झाले पाहिजे हे माझे उद्दिष्ट असायचे ते मी पूर्ण केल्याचे मला समाधान आहे.असे सांगितले यावेळी बांधकाम विभागाचे उपविभागीय  अभियंता व जी .व्ही पाटील  अनेक अधिकारी उपस्थित होते


Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....