अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जामनेर तालुकाध्यक्ष पदी राहुल दत्तात्रय चव्हाण यांची निवड


( नितीन इंगळे )
सविस्तर वृत्त असे की , आज दि 24 जुलै रोजी मराठा मंगलकार्यालय जामनेर येथे अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक बोलवण्यात आली होती या वेळी मराठा समाजाला न्याय व संघटना बांधणी कामी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र कोंढरे ,प्रदेश उपाध्यक्ष मा आ नरेंद्र पाटील,  युवक प्रदेश उपाध्यक्ष दिव्यांक सावंत यांच्या आदेशानुसार  व जिल्हाध्यक्ष प्रा मनोज पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली व जामनेर जिल्हा उपाध्यक्ष अतुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जामनेर तालुकाध्यक्ष पदी राहुल दत्तात्रय चव्हाण , महिला तालुकाध्यक्ष पदी संगीता रविंद्र सूर्यवंशी  व युवा तालुकाध्यक्ष पदी अशोक कृष्णा पाटील (केकतनिंभोरे ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ,
     तसेच युवा तालुका उपाध्यक्ष सागर पाटील , युवा तालुका सचिव मयूर पाटील , युवा शहर अध्यक्ष दीपक पाटील , युवा शहर उपाध्यक्ष निखिल खंडारे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली त्यानिमित्ताने तालुक्यातील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी व समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न या द्वारे करण्यात येणार आहे. तालुक्यातील मराठा समाजातील तळागाळातील सेवकांना शासकीय योजना , रोजगार , शिक्षण , विवाह , अन्य सर्व प्रकारच्या समस्येवर विचार विनिमय करून तोडगा काढण्यासाठी ची एक नवीन मोहीम अखिल भारतीय मराठा महासंघ  सुरू करणार आहे त्यासाठी तालुक्यातील विशेषतः रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी याद्वारे उपक्रम हाती घेऊन नवीन पायंडा उभा केला जाणार आहे. असं प्रतिपादन नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राहुल चव्हाण यांनी केले 
     आजच्या या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करतांना जिल्हा उपाध्यक्ष अतुल सोनवणे ,  सुरेश चव्हाण , विलास पाटील , अतुल शिंदे , रविंद सूर्यवंशी , भिका सोनवणे ,किरण जंजाळ ,जीवन सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे ,राहुलरॉय मुळे ,ईश्वर चौरे ,रविंद्र बंडे 
आदी मराठा सेवक उपस्थित होते , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री योगेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश चव्हाण यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....