जामनेर तहसिल समोर आदीवासी भिल्ल समाजातर्फे आक्रोश मोर्चा, रास्ता रोको आंदोलण

प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                                          आदिवासी एकता परिषद महा. राज्य संपर्क प्रमुख सुनिल  गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली  मोर्चा काढण्यात आला भिल्ल समाजातर्फे जामनेर तहसिल समोर आक्रोश मोर्चा, रास्ता रोको  आंदोलण करण्यात आले आदीवासी भिल्ल समाजाच्या गंगापूरी येथील तरुणाची हत्या करण्यात आली होती मारेकऱ्यास   फाशीची शीक्षा झाली पाहीजे  व पीडीत कुटुंबीयांसाठी आठ लाख रुपयाची आर्थिक मदत शासनाने केली पाहीजे या मागणीसाठी जामनेर तहसिल समोर  आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तसेच  प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी वाहने अडविण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती 
 आदिवासी  एकता परिषद राज्य संपर्क प्रमुख सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा तहसिल कार्यालय वर धडकला. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी  प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली तसेच निवेदन स्विकारण्यासाठी तहसिलदार अरुण शेवाळे तात्काळ  उपस्थित  झाले समाजबांधवांनी तहसील समोर रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको केला.
भिल्ल समाज बांधवांचे तहसिल समोर ठिय्या आंदोलन सुरु असतांना एस टी बस समोरुन आली. मात्र, समोर आंदोलन सुरु असल्याने चालकाने गाडी काही अंतरावर थांबली व काही सेकंदात यू टर्न घेऊन ही बस माघारी एस टी बस स्टॅन्ड कडे निघून गेली  जोपर्यंत लेखी मिळणार नाही घ तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा उपस्थित सर्व भिल्ल समाजबांधवांनी घेतला. त्यानंतर भर उन्हात बराच वेळ हे आंदोलन सुरु होते.या मोर्चात  
उपस्थित पदाधिकारी जिल्हा संपर्कप्रमुख सुधाकर भाऊ सोनवणे तालुका अध्यक्ष लहू मोरे राजू मोरे सालुसिंग शेवाळे बळीराम सोनवणे अशोक मोरे

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....