सहा लाखाच्या लाचेची मागणी करणारा वीज सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यातून फरार

प्रतिनिधि ( नितीन इंगळे )

   वीज डीपी मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रूपयांची मागणी नेरीतील सहाय्यक अभियंत्याने केली होती त्यानुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करण्याच्या तयारीत असतांना संशयिताला सुगावा लागल्याने पथकावर चारचाकी वाहन घालून पसार झाला या घटनेमुळे जामनेर शहरात खळबळ उडाली आहे हेमंत शालिग्राम पाटील रा. जामनेर असे संबंधीत अभियंत्याचे नाव आहे सदर सापळा औरंगाबाद एसीबी पथकाने राबवला नेरी येथे सदर अभियंता कार्यरत असल्याचे समजते सहा लाख रुपयांची लाच मागणी करणा-या अभियंत्याला एसीबीचा सापळा रचला जात असल्याची कुणकुण लागताच त्याने पळून जाण्याचा मार्ग पत्करला त्याने सापळा अधिका-यांच्या अंगावर वाहन चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे समजते त्याच्या विरुद्ध एसीबीच्या कलमासह सरकारी कामात अडथळा आणल्याचे कलम लावण्यात आल्याचे समजते



Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....