जामनेरातील रस्त्यांवर भटक्या डुकरांचा उच्छाद ...मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची नगरपालिकेकडे मागणी
प्रतिनिधि ( नितीन इंगळे ) जामनेर शहरातील शिक्षक कॉलनी सपकाळ हॉस्पिटल निवासस्थान आवारात पाचोरा रोड जवळ येथे खुल्या भूखंड आणि ओपन प्लाट च्या जागेत मोठ्या प्रमाणावर डुकरांचा वावर वाढला
असून त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे तसेच लहान मुलांच्या खेळात त्यांचे वास्तव असल्यामुळे त्या आवारातील लहान मुलांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच जामनेर शहरातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात डुकरांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची नगरपालिकेकडे कॉलणीतील नागरीकांनी निवेदण देउन मागणी करण्यात आली सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे आधीच रोगराईच्या वातावरणात परिसरातील ही अस्वच्छता आणि त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेला डुकरांचा वावर अधिक घातक आहे यावर नगरपालिकेने त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
Comments
Post a Comment