लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचे न्यायाधीश डी.एन.चामले यांचे आवाहन


जामनेर, प्रतिनिधी
जामनेर न्यायालयात दि.१३ आँगस्ट २०२२शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असुन या लोक अदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत असे आवाहन न्यायाधीश डी.एन.चामले यांनी केले आहे.
मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच जळगांव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये जामनेर तालुका विधी सेवा समिती व जामनेर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ आँगस्ट २०२२ शनिवारी सकाळी १०-३० वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीत अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होऊन त्यांची न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखल पुर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत असे आवाहन जामनेर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश डी.एन.चामले यांनी केले आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित दिवाणी दावे,दाखल पुर्व प्रकरणे, बँक कर्ज प्रकरणे,धनादेशाचे प्रकरणे यासह इतर प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....