ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाचा अपहार - जनार्धन कुमावत यांची तक्रार
जामनेर तालुक्यातील हिवरखेडा त.वा.येथे ग्रामपंचायतचा मनमानी कारभार व सरपंचाने अपहार केल्याची तक्रार जनार्धन कुमावत यांनी केली.२०१९ २०२० या वर्षात ग्रामपंचायतने गावात कामे ण करता निधी काढण्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या.
जामनेर तालुक्यातील हिवरखेडा त.वा.येथे समशान भूमिजवळ नाल्यावर येण्याजाण्यासाठी कागदोपत्री असलेली मोरी मात्र येथे चोरी गेल्याची तक्रार करण्यात आली.त्याच प्रमाणे अंगणवाडी दुरुस्ती साठी काढलेल्या निधीतून फक्त एक दरवाजा बसविण्यात आला. त्याचप्रमाणे दलित वस्तीमध्ये पाच ते सहा वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधण्यात आली.त्या टाकी मध्ये आज पर्यंत एक थेंब देखील टाकण्यात आला नाही.तशेच ण वापरलेल्या पाण्याच्या टाकी साठी पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी निधी काढण्यात आला.परंतु दुरुस्ती तर नाहीच परंतु टी टाकी आहे किंवा नाही हे देखील सरपंच ,ग्रामसेवक यांच्या कडून पाहण्यात आले नाही.सरपंचानी तर गावठांच्या जागा कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर भूगोटे उतरवून घेतले आहे..अश्या प्रतिक्रिया जनार्धन कुमावत यांनी दिल्या व ग्रामपंचायतचा चालेला भोंगळ व मनमानी कारभाराच्या तक्रारी केल्या.
तत्कालीन सरपंच पती यांच्याशी संपर्क साधला असता आमची तक्रार कोठे हि करा अश्या प्रतिक्रिया दिल्या. हिवरखेडा त.वा.येथील ग्रामपंचायतच्या तक्रारी विषयी विस्तार अधिकारी पालवे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी हा विषय माझ्याकडे नाही तो बांधकाम विभागाला जावून विचारा माझा काही संबंध नाही.पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी कोणत्या कामासाठी असतो असा प्रश्न ग्रामस्थांना येथे पडलेला आहे.
प्रशासनाकडून अश्या मनमानी करणाऱ्या प्रतिनिधी,प्रसाकीय अधिकारी यांची चौकशी करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे
जामनेर तालुक्यातील हिवरखेडा त.वा.येथे ग्रामपंचायतमध्ये अपहार झाल्याची घटना उघड झाल्याने सम्पूर्ण परिसरात प्रशासना विषयी केराच्या टोपलीने स्वागत केले जात आहे.
Comments
Post a Comment