मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने महिला,शेतकरी,विद्यार्थ्याचा जिल्हा मेळावा २५ सप्टेंबरला जामनेर येथे आयोजन

 शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थी,शेतकरी,महिलांंसाठी २५ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरावरील महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेवक समितीचे जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जिल्हा समन्वयक गणेश पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायके उपस्थित होते.मेळाव्याला आबासाहेब पाटील(संस्थापक अध्यक्ष-शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य व मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक),रामदास झोळ हे प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.तर स्री सबलीकरण व सक्षमीकरण महिला उद्योग या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून सोनम पाटील या मार्गदर्शन करणार आहेत. शिवशाहीर सुरेश जाधव यांंचा पोवाड्याचे आयोजनही यावेळी केले असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली. वैशाली शिंदे, राजाभाऊ कदम,संजय पाटील,शरद उबाळे,जयश्री पवार, लक्ष्मण पाटील,सागर धनवडे,बाळासाहेब हंगारगे यांची प्रमुख उपस्थिती मेळाव्याला राहणार आहे.मराठा मंगल कार्यालय जळगाव रोड जामनेर येथे सांयकाळी ४ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी,महिला,शेतकरी बांधवांनी आयोजित मेळाव्याला लक्षणीय संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....