सेलू येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची जामनेर तालुका नाभिक समाज मंडळाची जामनेर तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन मागणी

शेलु जि.परभणी येथील११ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर पोक्सो व बाललैंगिक प्रतिबंध कायद्याअंतर्गत कडक कारवाई करून फाशी द्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा जामनेर तालुका नाभिक समाज मंडळ च्या वतीने देण्यात आला याबाबतचे निवेदन आज दि.१३ जामनेर तहसीलदार अरूण शेवाळे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले... ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असुन या घटनेची सखोल चौकशी करावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी जेणे करुन समाजात अशा घटना करण्यास कुणाचीही हिमंत होणार नाही. सर्व समाजातील महिला व तरुणी सुरक्षित राहतील. शासनाने महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचाराला लगाम लावण्यासाठी कठोरातील कठोर कायदा आणुन अशा कुकर्म करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशीची शिक्षा मिळावी अशी त्या कायद्यात तरतुद करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. हा खटला जलद न्यायालयात चालवून आरोपीला फाशी द्यावी, पीडित कुटुंबालातात्काळ आर्थिक मदत द्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी नाभिक जामनेर तालुका समाज मंडळ उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....