जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे या गावात लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पंकज आशिया यांनी केली पशुधनाची पाहणी

जामनेर तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथे लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुधनाची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पंकज आशिया यांनी भेट देऊन पशुपालक शेतकऱ्यांसोबत संवाद साधून  
मार्गदर्शन केले व लम्पी आजाराने मृत्यूपावलेल्या जनावरांची माहिती घेतली व लागण झालेल्या जनावरांवर योग्य उपचार शासना तर्फे करण्यात येते आहे तालुक्यातील ग्रामीण भागात लम्पी रोगाने थैमान घातले असल्याने अनेक जनावरे दगावण्याची शक्यता येत आहे.त्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या जनावराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तरच लम्पी रोगावर नियंत्रण मिळवू शकतो तसेच पशुपालकानां  गोठा व परिसरात स्वच्छता राखण्याच्या सूचना दिल्या त्यावेळी गटविकास अधिकारी  श्री.व्ही.एम.सनेर साहेब,तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.श्रीकांत व्यव्हारे तसेच त्यांचे सहकारी व ग्रा.प.पळासखेडे मिराचे ग्रामविकास अधिकारी श्री.डी.पी.टेमकर,उपसरपंच श्री.रविंद्र प्रकाश हडप तसेच मंगलसिंग भाऊ राजपूत,महावीर भाऊ जैन,गोपाळ हडप तसेच गावातील शेतकरी व  ग्रा.प. कर्मचारी आदी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....