तळेगाव येथे मोफत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन पंचकोशीतील गरजु रुग्णांनी मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा



तळेगाव ता.जामनेर ता.२४ तळेगाव येथे मोफत भव्य दिव्य शिबिराचे आयोजन केले असून श्री प्रकाशचंद जैन मल्टीस्टेट हॉस्पिटल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर पळसखेडा ता. जामनेर तसेच जय किसान  विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित तळेगाव ता.जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले. असून सर्व पंचकोशीतील   सर्व नागरिक बंधू-भगिनींनी गरजू रुग्णांनी मोफत भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात दमा व श्वाससाचे आजार, हदय व त्यासंबंधी आजार, मधुमेह त्यांचे दुष्परिणाम, किडनी संबंधी आजार, पोटाचे आजार, पाठीच्या कन्या हाडाचे आजार, अंगदुखी, नाक कान घसा संबंधी आजार, मेंदूचे विकार,  पाळीचे विकार, श्वेत पदर वंध्यत्व गर्भाशयाचे आजार, लहान मुलांचे आजार, प्रस्तुती पूर्व व नंतरचे आजार, स्तनाचे आजार, इसब चामखीळ व इतर सर्व विकार, मूळव्याध, भगंदर, केसाच्या समस्या व सौंदर्य बुद्धी, सोरायसिस पित्त येणे, संधिवात, प्रतिकारशक्ती  कावीळ पचनक्रियेचे आजार, जुनाट सर्दी, थायरॉईड ,मूत्रमार्गाचे आजार या सर्व आजारांवर मोफत तपासणी केली जाणार असून उपचार सुद्धा केले जाणार आहे मात्र लघवी व रक्त  तपासणीसाठी अल्प दरामध्ये तपासणी केली जाणार आहे. तरी सर्व गरजू रुग्णांनी व पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जय किसान  सोसायटी व प्रकाशचंद जैन मल्टीस्टेट आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्यामार्फत करण्यात आले आहे. शिबिरासाठी  उपलब्ध तज्ञ डॉ. कोमलकुमार डाकलिया (प्राचार्य) - एमडी (हदयरोग तज्ञ पोटाचे विकार मेंदू विकार )डॉ. हेमंत नारखेडे - एमडी (सर्जन ) डॉ. नरेंद्र राका - एमडी (बालरोगतज्ञ ) डॉ.निकुंज गुजराथी - एमडी (नेत्ररोग )  डॉ. मनीषा राका - एमडी (स्त्रीरोग तज्ञ) डॉ.उज्वला राणे - एमडी (त्वचा ) डॉ.मयूर जाधव - एमडी हे तज्ञ डॉ. उपलब्ध होणार असून सर्व गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....